शुक्रवारी कर्नाटकात 12229 घशातील स्त्रावाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.आजवरचा हा उच्चांकी आकडा आहे.आजवर 186526 घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 183088 जण निगेटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी तपासण्यात आलेल्या 12229 पैकी 11604 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.आजवर बंगलोरला आठ आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स बंगलोरला आल्या असून त्यातून 1035 प्रवासी आले आहेत.
असा आहे शुक्रवारीचा बेळगावचा आकडा
22 मे लोकल हेल्थ बुलेटिन अनुसार 314 अहवाल प्रतीक्षेत असून दिवसा अखेर बेळगावात 120 पोजिटिव्ह आहेत 8 पोजिटिव्ह बागलकोट असून त्यांच्यावर बेळगावात उपचार सुरू आहेत त्यामुळे हा आकडा 128 झाला आहे – 120 पैकी 70 डिस्चार्ज तर 57 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत ज्यांच्यावर बिम्स मध्ये उपचार सुरू आहेत.
बेळगाव जिल्ह्यात आता पर्यंत 9082 जण निरीक्षणा खाली असून 1549 जण 14 दिवसांचे क्वांरंटाइन मध्ये आहेत 4833 जणांचे 14 दिवसांचे क्वांरंटाईन पूर्ण झाले आहे तर 2643 जणांचे 28 दिवसांचे क्वांरटाइन पूर्ण झाले आहे.बेळगावात 7786 जणांचे घश्याचे द्रव घेण्यात आले तर त्यात 7217 निगेटिव्ह आले आहेत.