लॉक डाऊनमुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. अशा परिस्थितीत अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र तालुक्यात उद्योग खात्री योजनेतून पुन्हा कामाला गती देण्यात आल्याचे दिसून आले आहे.
कोरोना मुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली. सध्या उद्योग खात्रीतून विविध कामांना चालना देण्यात आले आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी रेडझोन नाही त्या ठिकाणी उद्योग क्षेत्रातील कामांना सुरुवात करण्यात आली. तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी सुरक्षित अंतर ठेवून कामांना चालना देण्याचे आवाहन केले आहे.
उद्योग खात्री कामातून गटारी तलावे तसेच इतर कामे करण्यात येत आहेत. फक्त काही भागातच या कामांना चालना देण्यात आल्याने कामगारातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आणखी काही दिवस गेल्यानंतर उद्योग खात्यातील कामांना गती देण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व भागात कामे सुरू करण्याचे निर्देश लवकरच देण्यात येणार असल्याचे कलादगी यांनी सांगितले आहे.
लॉक डाऊन परिस्थिती उद्भवल्याने अनेक ठिकाणी घरात राहूनच नियमांचे पालन केले आहे. मात्र आता उद्योग खात्रातील कामे सुरु करण्यात आली असली तरी त्या ठिकाणीही सुरक्षित अंतर ठेवून कामे करावीत असे आवाहन मल्लिकार्जुन कलादगी यांनी केले आहे. तालुक्यातील काही भागात कामांना चालना देण्यात आली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच इतर भागातही कामे सुरू होतील असे, आश्वासनही त्यांनी दिले आहे.