कर्नाटक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 26 मे 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 101 बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,283 इतकी झाली आहे. तसेच बेळगाव जिल्ह्यात नव्याने 13 रुग्ण आढळून आल्यामुळे येथील एकूण कोरोना बाधितांची संख्या 135 झाली आहे.
कर्नाटक आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात काल सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज मंगळवार दि. 26 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने 101 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,283 इतकी वाढली आहे. यापैकी आत्तापर्यंत 748 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्याने आढळून आलेल्या 101 कोरोना बाधितांमध्ये 81 जण परराज्यातील असून 4 आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 1,489 इतके असून यापैकी 18 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 44 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासात नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या जिल्ह्यांमध्ये बेंगलोर शहर (2 रुग्ण), बेळगाव (13), यादगिर (14), दावणगिरी (11), चिकबळ्ळापूर (1), हासन (13), उडपी (3), बिदर (10), विजयपुरा (6), चित्रदुर्ग (20), बेळ्ळारी (1), कोलार (2),कोप्पळ (1 रुग्ण) या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात अन्यत्र 4 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.
*जिल्ह्यात 11,037 जणांचे निरीक्षण*
बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने आणखी 13 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 26 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 135 इतकी झाली असून परजिल्ह्यातील (बागलकोट) 8 पाॅझिटिव्ह रुग्ण बेळगावात उपचार घेत आहेत.
वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 25 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून मंगळवार दि. 26 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 11,037 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 2,989 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 48 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 3,603 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 4,397 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 9,741 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 135 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून 7,934 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्याबाहेरील (बागलकोट) पॉझिटिव्ह रुग्ण 08 आहेत. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसीस 48 असून आतापर्यंत जिल्ह्यातील 94 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.