शुक्रवारी हिरेबागेवाडीचे दहा आणि कुडची एक असे 11 पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने हादरलेल्या बेळगावला रविवारी पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.रविवारी सकाळीच्या बुलेटिन मध्ये नवीन 22 पोजिटिव्ह रुग्णांची भर पडली असून आकडा शंभर पार झाला आहे
हिरेबागेवाडी येथे काल शुक्रवारी दहा रुग्णांनी बेळगावची संख्या 85 वर पोहोचली होती रविवारी मिळालेल्या रुग्णां नंतर बेळगावने शंभरी पार करत 107 झाली आहे.लॉक डाऊन शिथिल झाल्यापासून बेळगावचा ऑरेंझ झोन मध्ये समावेश झाल्या नंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत होती अलीकडे पाच दिवसात 21 जण करुणा मुक्त झाले होते एकूण 36 निगेटिव्ह झाले आहेत त्यामुळे लवकरच जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता त्यात शुक्रवारी 11 आज रविवारी 18 असें रुग्ण… सापडले आहेत.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी गेल्या 16 एप्रिल रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी 17 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर 30 एप्रिल रोजी एकाच दिवशी 14 कोरोना बाधित रुग्णांची जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत भर पडली होती. त्यानंतर आता शुक्रवार दि. 8 मे 2020 रोजी जिल्ह्यात 11 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते तर आज 10 मे रोजीची 22 ही मोठी संख्या आहे.
बेळगाव जिल्ह्यातील ही चौथी वेळ आहे की दहापेक्षा अधिक रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत यामुळे सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधीत यांचा आकडा 107 वर पोहोचला आहे. रविवारी आढळलेले सगळे रुग्ण अजमेर हुन परतले होते अशी देखील माहिती मेडीकल बुलेटिन मध्ये देण्यात आली आहे तर या 22 मध्ये 13 महिला तर 9 पुरुष आहेत.सर्वांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे 22 रुग्ण चिकोडी हुक्केरी निपाणी भागातील असल्याची देखील माहिती उपलब्ध झाली आहे.