बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 108 वर पोचली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीहून परतलेल्या तबलीगी आणि परराज्यातून येणाऱ्या मुळे हा धोका वाढला होता. आता निजामुद्दीनहुन आलेल्यांची साखळी तुटली असल्याचा दावा आरोग्य खाते करत असला तरी अजमेर आणि मुंबई कनेक्शनमुळे पुन्हा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
धारावीमुंबई तुन आलेल्या एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली होती. तिच्या संपर्कात एकूण 45 जण आले आहेत. त्यामुळे आता त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मात्र त्यामधील काहीजण पॉझिटिव्ह सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या महिलेच्या थेट संपर्कात येणारे दहा जण आहेत. सध्या दिल्ली येथील मरकज धर्मसभेत भाग घेऊन परतलेल्यांच्यामुळे कोरोना झाला होता. मात्र ती साखळी आता तोडण्यात आरोग्य खात्याला यश आले आहे. याचबरोबर अजमेर हुन परतलेल्या 38 जणांना आरोग्य खात्याने वेळेत ताब्यात घेतल्याने हा धोका देखील टळला आहे.
108 पैकी पाहिले 85 पोजीटिव्ह हे दिल्ली मरकजशी संबंधित होते त्यानंतर चे 22 रुग्ण अजमेर हुन परतले होते दिल्लीची साखळी तर तुटलीच आहे हिरेबागेवाडी कुडची वगळता कुठेच याची तीव्रता जाणवली नाही त्यात अजमेर कनेक्शन देखील निपाणी सीमेवरच क्वारंटाइन झाल्याने तो देखील वाढण्याचा धोका कमी आहे मात्र बेळगाव शहरात मुंबई कनेक्शनची धास्ती अधिक आहे.
मात्र परराज्यातून आणि मुंबई येथील धारावीतील सापडलेल्या महिलेच्या संपर्कात आल्याने पुन्हा कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत जर हा धोका टाळायचा असेल तर आणखीन काही दिवस लॉक डाऊन वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. दिनांक 17 पासून लॉक डाऊनमध्ये काही शिथिलता करण्यात येणार आहे. मात्र अजमेर आणि मुंबई कनेक्शनचे पुढे काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
How can i come to hetterggi from goa. At present .working in AEQUS staying in yamkanmardi