बेळगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बेळगाव शहराचा पारा 39 अंशांवर जाऊन पोचला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे कठीण बनले आहे. सध्या बेळगाव शहर शांत आहे. त्यामुळे सर्वत्रच पंखे व एअर कुलर सतत सुरू असल्याचे दिसून येत आहे. लॉक डाऊनचा दुसरा टप्पा संपला असून आता तिसऱ्या टप्प्यात बेळगाव शहराची कार्यपद्धत सुरू आहे.
शुक्रवारी बेळगाव शहरात 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉक डाऊन कडक करण्याचे निर्देश देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र बेळगाव शहराचा वाढता पारही अनेकांना घरात बसण्यासाठी मजबूर करत असल्याचे दिसून येत आहे.
मागील महिन्यात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत. मात्र वळीवामुळे उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या कामात गुंतला आहे. यातच उष्म्याचा कहर झाल्याचे दिसून येत आहे. अनेक नागरिक हैराण झाले आहेत. लॉक डाऊनमुळे उन्हापासून गारवा देणारे रसवंतीगृह हे थंड पेयाची दुकाने यासह अनेक व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. बेळगावचा पारा 39 अंशांवर जाऊन पोचला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर या वर्षी उच्चांकी गाठण्याचे ही निर्देश हवामान खात्याने दिले आहेत.
त्यामुळे सध्या तरी घरी राहा आणि सुरक्षित रहा असेच अनेकांना म्हणावे लागेल. कारण उष्म्यामुळे अनेकांना त्वचारोग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याचबरोबर कोरोनाची धास्ती आणि उष्म्याचा कहर अशा परिस्थितीत नागरिक हैराण झाले आहेत.