मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तींवर महानगरपालिका दंडात्मक कारवाई करत आहे.आजवर महानगरपालिकेने एक लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे.कोरोनामुक्त बेळगाव करण्यासाठी महानगरपालिका ही मोहीम राबवत आहे.
सामाजिक अंतर न पाळणाऱ्या व्यक्तींवर देखील कारवाई केली जात आहे.महानगरपालिकेने या नियमाच्या अंमलबजावणीसाठी पथके तयार केली आहेत.शहरात वर्दळीच्या ठिकाणी आणि प्रमुख मार्गावर ही पथके तैनात करण्यात आली आहेत.
मास्क परिधान न करता फिरणाऱ्या,सामाजिक अंतर न पाळणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीकडून जागेवरच महानगरपालिकेचे पथक दंड वसूल करत आहे.लॉक डाऊन नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करा असा आदेश सरकारने बजावला आहे.
त्याला अनुसरूनच महानगरपालिका दंडात्मक कारवाई करत आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल असा इशारा मनपा आयुक्त के एच जगदीश यांनी दिला आहे.