लॉक डाऊनच्या काळात माणसाला जगणे अवघड झाले आहे.माणसाच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढे येत आहेत पण अडचणीत सापडलेल्या प्राण्यांचे काय?हनुमान नगर येथे तीन दिवसापासून कुत्र्याचे पिल्लू ड्रेनेजमध्ये अडकून पडले होते.
याकडे एकाचे लक्ष गेल्यावर त्याने बावा संस्थेशी संपर्क साधला.बावाचे कार्यकर्ते हनुमान नगर येथे पोचले आणि त्यांनी पाहणी केली.हे ड्रेनेज दहा फूट खोल होते आणि वीस फूट रुंद होते.बावाचे कार्यकर्ते सज्ज होते.त्यांचा एक कार्यकर्ता ड्रेनेजमध्ये उतरला.
नशिबाने तेथे दुर्गंधी नव्हती.दुसऱ्या बाजूला देखील एक कार्यकर्ता थांबला.आत उतरलेल्या कार्यकर्त्याने दुर्गंधीला तोंड देत कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर काढले.नंतर त्याला पशु वैद्यकीय दवाखान्यात नेऊन स्वच्छता करून सलाईन लावण्यात आले.नंतर ती उघडी ड्रेनेज बंद करण्यात आली.या कामी प्रीती कोरे आणि निहार यांचे सहायय लाभले.