बेळगाव जिल्ह्याला बुधवार 20 मे रोजीचे मेडिकल बुलेटिन दिलासादायक आले असून एकही नवीन पोजिटिव्ह रुग्णांची वाढ तर नाहीच या शिवाय दोघे जण कोरोना मुक्त झाले आहेत.
बुधवारी रायबाग कुडची येथील पी 575 व पी 576 या दोघांचे नमुने सलग दुसऱ्यांदा निगेटिव्ह आले त्यामुळे त्यांना बिम्स मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.कुडची येथील एकूण 24 जण पोजिटिव्ह आले होते त्यापैकी 21 जण निगेटिव्ह आले आहेत त्यामुळं कुडची गावची वाटचाल कोरोनामुक्त कडे चालली आहे.
या अगोदर जिल्ह्यात 67 जण निगेटिव्ह झाले होते आजचे दोघे पकडून हा आकडा देखील वाढला आहे 69 वर पोहोचला आहे.
बुधवारी मेडिकल बुलेटिन मध्ये राज्यात नवीन 63 कोरोना पोजिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण आकडा 1458 वर पोहोचला आहे बेळगावात एकही रुग्ण वाढला नाही.
575 | 30 | Female | Kudachi, Raibag |
Secondary Contact of P-301
|
576 | 50 | Male | Kudachi, Raibag |
Secondary Contact of P-301
|