खरीप हंगामाला सुरुवात होते तसे बनावट बियाणे विक्री करण्यासाठी अनेक दुकानदार सज्ज होतात. अशा दुकानदारांचे सध्या फावत असून अनेक माया जमा करणाऱ्या दुकानदारांना आता कृषी खात्याने चांगला धडा शिकवला आहे. त्यामुळे यापुढे आता बनावट बियाणे विक्री करताय तर दुकानदारांनो सावधान असे म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र कृषी विभागाने केलेल्या कारवाईमुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 336 दुकानांची तपासणी करण्यात आली असून ही तपासणी करण्यासाठी कृषी विभागाचे 19 पथके तयार केली आहेत. जिल्ह्यातील विविध दुकानांवर त्यांनी धाडी टाकून बनावट खत तसेच तालुक्यातील 80 हजारांचे 740 किलो बी-बियाणे जप्त केले आहेत तर शंभर लिटर कीटकनाशक औषध जप्त करण्यात आली असून अनेक दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहेत. ही कारवाई आता सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून बनावट बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदाराची चांगलेच नाकीनऊ झाले आहेत. एकूण 292 दुकानावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तर अनेक दुकानांमधील बियाणांची विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लुबाडून स्वतःची झोळी भरून घेणाऱ्या दुकानदारांची आता गय केली जाणार नाही असे सांगण्यात येत आहे. याबाबत जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक झिलानी मोकाशी यांच्याशी संपर्क साधला असता ही कारवाई असेच सुरू राहणार असून यापुढे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजा बी-बियाणे खते औषधे खरेदी करू लागले आहेत. मात्र काही दुकानदार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आल्याने या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. यापुढेही मोहिमा सुरू ठेवून अनेक बेकायदेशीररीत्या व बनावट बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांना चांगला धडा शिकवू असा इशाराही कृषी खात्याने दिला आहे. त्यामुळे यापुढे दुकानदारांनो सावधान शेतकऱ्यांना योग्य ती बी-बियाणे देण्याचा सल्लाही जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Trending Now
Less than 1 min.
Previous article
Next article