एअर इंडिया चे दुसरे विमान 323 भारतीयांना घेऊन बेंगळूर ला येत आहे. हे दुसरे विमान असून युनायटेड किंगडम मध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन ते परत येत आहे. भारतीय सरकारच्या वंदे भारत अभियान अंतर्गत या विमानाची सोय करण्यात आली आहे.
विदेशात अडकलेल्या भारतीयांना घेऊन येण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे.या विमानातून एक 37 वर्षीय नागरिकाचा मृतदेह आणला जात आहे.
लॉक डाऊन सुरू झाला आणि सर्व आंतरराष्ट्रीय विमाने बंद झाली तेंव्हा त्या व्यक्तीने आत्महत्या केली होती. गदीगेप्पगौडा ओंकारगौडा पाटील असे त्या व्यक्तीचे नाव आहे. 13 मार्च रोजी त्याने आत्महत्या केली होती.