राज्यात येत्या शुक्रवार दि. 22 मे 2020 पासून प्रायोगिक तत्वावर दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली.
बेळगाव येथे बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना रेल्वेमंत्री सुरेश अंगडी म्हणाले की, 22 मे पासून बेंगलोर ते बेळगाव आणि बेंगलोर ते म्हैसूर अशा दोन प्रवासी रेल्वे गाड्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत. बेंगलोर – बेळगाव रेल्वे बेंगलोर येथून सकाळी 8:00 वाजता सुटून बेळगाव येथे सायंकाळी 6:30 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे बेंगलोर – म्हैसूर रेल्वे बेंगलोर येथून सकाळी 9:00 वाजता सुटून दुपारी 12:45 वाजता म्हैसूर येथे पोहोचेल.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या विनंतीला मान देऊन प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणाऱ्या या रेल्वे गाड्यांसाठी प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रवासादरम्यान कोरोना संदर्भातील मास्कसह स्वच्छतेच्या आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे, असेही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी स्पष्ट केले आहे.
Very nic sir PL rajsthan trans avalbal karvo sir