लॉक डाउन च्या काळात केंद्र सरकारने देशातील नागरिकांना मनोरंजन व्हावे या निमित्ताने रामायण आणि महाभारत तसेच शाळकरी मुलांसाठी शक्तिमान या गाजलेल्या मालिका दूरदर्शनवर पुन्हा सुरू केल्या आहेत
तसेच अलीकडे गाजलेली स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सुद्धा महाराष्ट्र च्या रसिकांना पुन्हा प्रसारित सुरू केल्या आहेत
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती ने सुद्धा घरी लोकडोऊन असलेल्या समस्त मराठी जणांना आणि शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज यांच आणि स्वराज्य कस उभं राहिलं याची माहिती मिळावी म्हणून ऐतिहासिक *राजा शिवछत्रपती* ही मालिका पुनःश्च सूरु करण्यात यावी अशी मागणी ट्विटर द्वारे स्टार प्रवाह या वहिनी कडे आणि खासदार श्री अमोल कोल्हे यांच्याकडे २८ मार्च रोजी केली होती !
या मागणीची दखल घेत स्टार प्रवाह ने ऐतिहासिक *राजा शिवछत्रपती* ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यात येणार आहे असं स्वतःच्या ट्वीटर हँडल वरून सांगितलं आहे
सदर मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ०५ :३० वाजता आणि पुनरप्रसारण सकाळी ०९:०० वाजता केले जाणार आहे:
तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केले आहे