सारा देश लॉक डाऊन परिस्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीत अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्ते गरिबांच्या मदतीसाठी धावपळ करत आहेत. यासाठी अनेक जण रात्रीचा दिवस करून मदत कार्यात सहभागी झाले आहेत. मात्र अशीच सामाजिक आगळीवेगळी सेवा निलजीतील एका तरुणाने केली आहे. त्याच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
सारे जणच नागरिकांच्या मदतीसाठी धावत आहेत. मात्र निलजी गावातील किसन पाटील या तरुणाने भटक्या वानरांसाठी एक पाऊल पुढे केले आहे. दररोज तो आपल्या घरातील काहीतरी खाद्य आणून वानरांना घालत आहे. त्यामुळे वानरे ही त्याच्याकडे येताना दिसत आहेत. हा आश्चर्यचकित धक्का अनेकांनी पाहिल्यानंतर त्याच्या सामाजिक कार्याचे गोडवे गातानाचे चित्र सध्या दिसू लागले आहे.
काही संघ संस्था बेळगाव शहरातील सर्व भटक्या जनावरांसाठी चारा पाणी आधी खाण्याची सोय करत आहेत. त्याचबरोबर मुक्या प्राण्यांना गोशाळेत पाठविण्याचे कार्य ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्याला लॉक डाऊन परिस्थितीमुळे जनावरांची काळजी घेतली जात आहे. मात्र माकडांचीही परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे निलजी येथील किसन पाटील यांनी वानरांचे ही पोट भरण्याकडे लक्ष दिल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक प्राणी प्रेमी ही जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी झटत आहेत. मात्र निलजी गावातील किसन पाटील यांनी एक नवा पायंडा पाडल्याचे दिसून येत आहे. चक्क भटक्या वानरांसाठी त्यांनी खाद्याची सोय व पाण्याची सोय करून आपल्या सामाजिक कार्याची पोचपावती दिली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.