कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याचे गांभीर्य आता सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आले आहे. याची प्रचिती बुधवारी येळ्ळूर येथे आली, जेंव्हा ग्रा. पं. येळ्ळूर कोरोना संरक्षण कमिटीने दिल्लीच्या निजामुद्दीन या वादग्रस्त भागातून आलेल्या गावातील एका इसमाला आरोग्य खात्याच्या ताब्यात देऊन त्याची रवानगी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केली.
सल्लाउद्दिन उलमरसाब मुल्ला (रा. मंगाईनगर 5 वा क्रॉस, येळ्ळूर) असे संबंधित इसमाचे नाव आहे. दिल्लीतील निजामुद्दीन या भागात मार्चच्या प्रारंभी तबलिगी जमात या इस्लामधर्मीय संस्थेच्या कार्यक्रमामुळे देशभर करण्याचा प्रसार झाल्याची आता उघड झाले आहे. सदर कार्यक्रमात सहभागी झालेला एक इसम आपल्या गावात राहात असल्याची माहिती येळ्ळूर ग्रामपंचायतीला मिळताच बुधवारी ग्रा. पं. येळ्ळूर कोरोना संरक्षण कमिटीच्या सदस्यांनी मंगाईनगर 5 वा क्रॉस येथे धाव घेतली तसेच प्रशासनाला याबाबतची माहिती दिली.
सदर माहिती मिळताच आरोग्य खात्याच्या एका पथकाने तात्काळ येळ्ळूरमध्ये दाखल होऊन सल्लाउद्दिन उलमरसाब मुल्ला याला ताब्यात घेतले. याप्रसंगी ग्राम पंचायत येळ्ळूर कोरोना संरक्षण कमिटीचे सदस्य वामन पाटील, राजू उघाडे, तानाजी हलगेकर, राजू पावले, शिवाजी पाटील, सरकारी अधिकारी डॉ रमेश दांडगी,पंचायत अधिकारी अरुण नायक आदी उपस्थीत होते. सध्या सल्लाउद्दिन उलमरसाब मुल्ला याला कोरोना तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.