कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने शहराबाहेर तीन भाजी मार्केट सुरू केली आहेत.पण तेथेही लोक गर्दी करत आहेत.सामाजिक अंतर पाळले जात नाही.त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची भीती आहे.
हिंडलको मैदान,आरटीओ मैदान आणि मालिनी सिटी मैदान येथे भाजी खरेदीसाठी येणाऱ्यांनी सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे.काही जण किरकोळ खरेदीसाठी ,घरच्यांसाठी भाजी खरेदी करण्यासाठी येत आहेत.
ही तीन मार्केट होलसेल भाजी खरेदीसाठी आहेत.त्यामुळे किरकोळ भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींवर एपीडिमेईक कायद्या द्वारे कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.
लाटकर यांचे ट्विट
दरम्यान पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी देखील ट्विट करत विना कारण भाजी खरेदीचे निमित्त करून घरा बाहेर पडणाऱ्या लोकांना ट्विट करत घरी राहण्याचे आवाहन केले आहे.नको ती कारणे देत घरा बाहेर पडणारे महाभाग पोलिसांना नाही तर स्वतःला देखील फसवत असल्याचं त्यांनी म्हटलंय. विना कारण घरा बाहेर पडून गर्दी करू नये अन्यथा पोलिसी कारवाईला सामोरे जा असेही त्या म्हणाल्या आहेत.