बेळगाव नव्याने स्थापन झालेल्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी व विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या पार्श्वभूमीवर बेळगावच्या चार ठिकाणी भाजी विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार पासून या भाजीविक्रीचा मुहूर्त लागला असून सुरक्षित अंतर ठेवून भाजी विक्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोमवार दिनांक 6 रोजी होलसेल भाजी मार्केट सुट्टी असल्याने मंगळवारपासून या भाजी मार्केट ला सुरुवात होणार आहे.
एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत असल्याने आणि कोरोनाची सध्या धास्ती लागून असल्याने सुरक्षित अंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यासाठी चार ठिकाणी भाजी विक्रीचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून भाजी विक्री सुरू झाली नसली तरी व्यापाऱ्यांना ज्या ठिकाणी भाजी विक्रीसाठी दुकाने हवे आहेत त्याठिकाणी तशी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून विविध ठिकाणी भाजी विक्री करण्यात येत आहे.
ऑटोनगर येथील आर टी ओ मैदानात, बी एस येडियुरप्पा मार्गावरील मालीनी सिटी येथे, याच बरोबर यमनापूर येथील हिंडाल्को फॅक्टरी जवळ आणि भाजी मार्केट येथील ए पी एम सी होलसेल भाजी मार्केट येथे भाजी विक्री करण्यात येणार आहे. कोणतीही गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. आता तीन महिने ही भाजी विक्री सुरू असणार आहे.
सोमवार हा भाजी मार्केट मधील सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे मंगळवारपासून ही भाजी विक्री सुरू होणार आहे. त्या भागातील शेतकऱ्यांना नव्याने सुरू करण्यात आलेल्या भाजी मार्केटकडे येण्याचा त्रास होत असल्याने पूर्व भागातील तीन ठिकाणी भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. संबंधित व्यापारी आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणीच भाजी विक्री करावी व लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारपासून नित्यनेमाने तीन महिने भाजी मार्केट संबंधित ठिकाणी सुरू असतील असे सांगण्यात येत आहे.