कोरन्टाईन विभागात रुग.सिव्हिल हॉस्पिटलच्या कोरन्टाईन विभागात ठेवण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांपैकी एक रुग्ण नृत्य करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. तसेच संबंधित रुग्णांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरन्टाईन दिलेल्या रूग्णांना सिव्हिल हॉस्पिटलच्या कोरन्टाईन विभागात ठेवण्यात आले आहे. यापैकी एक रुग्ण स्वैर नृत्य करत कोरन्टाईनची खिल्ली उडवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या सर्वत्र जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून बेळगावमध्ये नुकतेच 3 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाय योजना केल्या जात आहेत. यासाठी जनजागृती केली जात असून संशयित लोकांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक उपचार केले जात आहे. कोरन्टाईन विभागात असलेल्या रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर कांही कोरोना संशयितांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्याचप्रमाणे बेशिस्त आणि नींद्य वर्तन केले जात असल्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, हॉस्पिटलमध्ये नृत्य करणाऱ्या त्या कोरन्टाईन असलेल्या रुग्णाने आपल्यासह अन्य संशयित रुग्णांना कोरोना बाधित रुग्णांच्या सानिध्यात ठेवले जात असल्याचा आरोप केला आहे. आम्हा सर्वांना एकत्र ठेवले जात आहे, आमची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नाही, इतर हॉस्पिटलमध्ये कोरोना संशयितांची योग्य प्रकारे तपासणी करून त्यांना कोरन्टाईन दिले जाते. तथापि आमच्या बाबतीत यापैकी कांहीही घडलेले नाही, असे वक्तव्य संबंधित नृत्य करणाऱ्या रुग्णाने सोशल मीडियावर केले आहे.
share video link…..
where is video link????????????????????????????????
i found in youtube
https://www.youtube.com/watch?v=lv-WgT1bg-Y