कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉक डाऊनचा कालावधी 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला असून त्या अनुषंगाने आपत्कालीन सेवा देणाऱ्या खाजगी वाहनांसाठी विशेष आदेश जारी करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एकत्रित मार्गदर्शक तत्वानुसार भारत सरकारने जारी केलेला देशव्यापी लॉक डाऊन येत्या 3 मे 2020 पर्यंत कायम राहणार आहे.
या कालावधीत संचार बंदी असली तरी वैद्यकीय, पशुवैद्यकीय आणि जीवनावश्यक साहित्यासह अन्य आपत्कालीन सेवा देणाऱ्या खाजगी वाहनांना मात्र संचार करण्यास अनुमती असणार आहे. तथापि चारचाकी वाहनांच्या बाबतीत चालकासह फक्त एक व्यक्ती वाहनात बसू शकते. दुचाकी वाहनांच्या बाबतीत फक्त चालकालाच सार्वजनिक ठिकाणी ये – जा करण्याची परवानगी असणार आहे. त्यामुळे मागील सीटवर त्याला कोणालाही बसून घेता येणार नाही.