एकीकडे संपूर्ण देश कोरोनाशी झुंजत असताना सर्व व्यवहार ठप्प आहेत. लॉक डाऊन’मुळे अनेक जण घरीच बसणे पसंत केले आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या आर्थिक कणा मोडकळीला आला असताना अनेक संस्था हातभार लावत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव येथील तुकाराम बँकेने ही मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तुकाराम बँकेकडून 51000 कर्नाटक सरकारला तर 51000 महाराष्ट्र सरकारला देण्यात आले आहेत. कोरोनाच्या आर्थिक संकटात हातभार लावून सामाजिक हित जपणाऱ्या या बँकेने आम्हीही देशाबरोबर आहोत हे दाखवून दिले आहे. त्यांच्या या आर्थिक मदतीमुळे त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.
या बँकेचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी दोन्ही कडे डी डी द्वारे हा मदतनिधी पाठवला आहे.