Sunday, September 8, 2024

/

बेळगावसाठी मंगळवारी देखील दिलासा आकडा 42

 belgaum

कर्नाटक राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये काल सायंकाळपासून आणखी सात जणांची भर पडल्यामुळे राज्यातील करुणा बाधित यांची एकूण संख्या 415 झाली आहे. यापैकी 114 जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या काल सोमवारी 408 वर पोचली होती. त्यामध्ये सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज मंगळवार दि. 21 एप्रिल दुपारी 12 वाजेपर्यंत नव्याने 7 रुग्णांची भर पडली आहे. या सात रुग्णांमध्ये विजयपुरा आणि कलबुर्गी येथील प्रत्येकी तिघा जणांसह मंगळूर येथील एकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सातपैकी चार महिला आहेत. विजयपुरा येथील दोन महिला (वय 18 व 30) आणि एक युवक(18) पी – 306 क्रमांकाच्या रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना बाधित झाले आहेत. राज्यातील 415 कोरोना बाधित रुग्णांपैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून 114 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, बेळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात रोज रुग्ण सापडत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि शनिवारी एक रुग्ण कोरोना मुक्त झाल्यामुळे आणि गेले सलग तीन दिवस नव्याने एकही रुग्ण सापडला नसल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात केवळ 17 दिवसात 42 जणांना कोरोना विषाणुची बाधा झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक उपाय योजना राबवून सीलडाऊन केले आहे. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 42 रुग्णांची तब्येत चांगली आहे. त्यापैकी कांही जणांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या तपासण्या आणि खबरदारी घेण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

बेळगावातील कोरोना रुग्ण तपशील खालील तक्त्यात

Sl. no. P Age Gender Location History
1 126 70 Male Belgundi TJ – CURED
2 127 26 Male Camp, Belagavi TJ
3 128 20 Male Hire Bagewadi TJ
4 147 36 Female Kudachi, Raibag TJ
5 148 40 Male Kudachi, Raibag TJ
6 149 67 Female Kudachi, Raibag TJ
7 150 41 Female Kudachi, Raibag TJ
8 182 50 Male Hire Bagewadi Contact of P 128
9 192 40 Female Hire Bagewadi Contact of P128
10 193 22 Male Hire Bagewadi Contact of P128
11 223 19 Male Kudachi, Raibag Contact of P150
12 224 38 Male Hire Bagewadi Contact of P128
13 225 55 Male Kudachi, Raibag Contact of P150
14 226 25 Male Kudachi, Raibag Contact of P150
15 243 20 Male Kudachi, Raibag Contact of P149
16 244 14 Male Kudachi, Raibag Contact of P149
17 245 45 Male Kudachi, Raibag Contact of P149
18 258 33 Male Peeranwadi Travel to Delhi
19 279 80 Female Hire Bagewadi Deceased – Contact of P224
20 282 51 Female Hire Bagewadi Contact of P225
21 283 42 Male Hire Bagewadi Contact of P224
22 284 33 Male Hire Bagewadi Contact of P225
23 285 16 Female Hire Bagewadi Contact of P224
24 286 65 Female Hire Bagewadi Contact of P224
25 287 30 Female Hire Bagewadi Contact of P224
26 288 54 Female Hire Bagewadi Contact of P224
27 289 58 Female Hire Bagewadi Contact of P224
28 293 47 Male Sankeshwar Travel history to Delhi (repeat test)
29 294 25 Male Kudachi, Raibag Travel history to Delhi (repeat test)
30 295 45 Female Yellur Travel history to Delhi (repeat test)
31 296 30 Male Kudachi, Raibag Travel history to Delhi (repeat test)
32 297 43 Male Kudachi, Raibag Travel history to Delhi (repeat test)
33 298 50 Male Kudachi, Raibag Contact of P245
34 299 35 Male Kudachi, Raibag Contact of P245
35 300 25 Male Kudachi, Raibag Contact of P245
36 301 64 Male Kudachi, Raibag Contact of P245
37 355 34 Male Belagavi Contact of P 127
38 356 17 Male Belagavi Contact of P 127
39 357 46 Male Belagavi Contact of P 127
40 358 37 Male APMC PS, Belagavi Contact of P 127
41 359 38 Male Belagavi Contact of P 127
42 364 45 Male Hire Bagewadi Contact of P 128

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.