कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ग्रीन आणि ऑरेंज अशी विभागणी करण्याच्या आपल्या निकषांमध्ये कर्नाटक सरकारने नुकताच बदल केला आहे. नव्या निकषानुसार गेल्या या 28 दिवसात ज्या जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही तो जिल्हा ‘ग्रीन झोन” असणार आहे. यामुळे राज्यातील ग्रीन झोनची संख्या आता 14 वरून 13 इतकी कमी झाली आहे.
याउलट राज्यातील “रेड झोन” जिल्ह्यांची संख्या वाढली असून ती 14 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या 14 दिवसात एकही रुग्ण न आढळलेल्या परंतु गेल्या 15 ते 28 दिवसांपूर्वी किमान एक रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांना “ऑरेंज झोन” म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सुधारित निकषानुसार राज्यातील रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन असलेले जिल्हे खालील प्रमाणे आहेत.
रेड झोन जिल्हे : बेंगलोर शहर (87 रुग्ण), म्हैसूर (7), बेळगाव (55), कलबुर्गी (48), विजयपुरा (41), बागलकोट (29), मंड्या (18), बिदर (14), मंगळुर (12), बेळ्ळारी (10), चिकबेळ्ळापूर (8), धारवाड (8), गदग (5) आणि तुमकुर (1 रुग्ण).
ग्रीन झोन जिल्हे : यादगिर, रायचूर, हावेरी, कोप्पळ, दावणगेरी, शिवमोगा, चित्रदुर्ग, चिक्कमंगळूर, हासन, कोडगु, चामराजनगर, रामनगर व कोलार. ऑरेंज झोन जिल्हे : बेंगलोर ग्रामीण, कारवार आणि उडपी.