बेळगाव शहरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली असताना अनेक ठिकाणी उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना भाजी व इतर साहित्य मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्यातील तारिहाळ विभागाच्या तालुका पंचायत सदस्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे गावातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तालुका पंचायत सदस्य लक्ष्मी मास्तमर्डी यांनी घरोघरी जाऊन भाजी देण्याचा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे गावात समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी त्यांनी एका दिवसात 30 ते 35 हजार रुपयांची भाजी गावकऱ्यांना वाटली आहे. हा उपक्रम असाच सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
लॉक डाऊन मुळे एपीएमसी प्रशासनाने तीन ठिकाणी भाजी मार्केट सुरू केले आहे. मात्र त्याठिकाणी सुरक्षित अंतर ठेवण्यात न आल्याने मोठा गोंधळ सुरू आहे. अशा भाजी मार्केट मध्ये जाण्यास नागरिक धजत नसल्याचे सामोरे आले आहे. त्यामुळे तालुका पंचायत सदस्य लक्ष्मी मास्तमर्डी यांनी आपल्या गावात व परिसरात भाजीविक्रीचा अभिनव उपक्रम सुरू करून नागरिकांना दिलासा दिला आहे.
बुधवारी सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचा भाजीपाला त्यांनी घरोघरी जाऊन वाटला आहे. आणखी दोन दिवसात असाच उपक्रम ते राबविणार आहेत. यानंतर 3 मे पर्यंत सुमारे पाच ते सहा वेळा भाजी वाटपाचा उपक्रम राबविणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये आणि प्रशासनाने दिलेले नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. यासाऱ्या प्रकाराने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.