मागील आठ-दहा दिवसापासून एकाच ठिकाणी अडकून पडलेल्या उत्तर प्रदेश मधील कामगारांचे परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र याची माहिती मिळतात तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी तातडीने दखल घेऊन याबाबत बस्तवाड ग्रामपंचायतीला त्यांना अन्नधान्य पुरवठा करण्याचे सांगितले होते. ग्रामपंचायतीने तातडीने त्यांची भेट घेऊन त्यांना सर्व ते साहित्य दिले आहे. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
लॉक डाऊनमुळे कमकारहट्टी येथील एका खोलीत अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशातील 4 असहाय्य कामगारांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुका परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीला सांगून त्यांच्या व्यथा दूर गेले आहेत. देशव्यापी लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून बेळगाव सुवर्ण सौध इमारतीपासून कांही अंतरावर असलेल्या कमकारहट्टी (ता. बेळगाव) गावात हे चार कामगार अडकून पडले होते.
![Tp kaladagi up majdur](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/04/IMG-20200411-WA0398.jpg)
सदर चारही कामगार मूळचे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील असून कामानिमित्त ते बेळगावला आले होते. लाॅक डाऊन जाहीर होताच सर्व व्यवहार ठप्प होण्याबरोबरच संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे या चौघा जणांवर एका खोलीत अडकून पडण्याची वेळ आली होती. गेल्या 8 -10 दिवसापासून अन्नपाण्याविना हे कामगार कसेबसे दिवस कंठत होते. मात्र ग्रामपंचायतीने त्यांना आता योग्य ते अन्नधान्य पुरवठा केला आहे. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या कामगारांनी मध्यंतरी खोलीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. तथापि बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी त्यांना पुन्हा खोलीत पिटाळले. या कामगारांनी आपल्याला मदत करावी असे आवाहन केले होते. या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना सर्व ते साहित्य देण्यात आले आहे. त्यांनी एका व्हिडिओद्वारे देखील या सर्वांचे आभार मान्य आहे. त्यामुळे मलिकाअर्जुन कलादगी यांच्या कर्तव्यदक्ष पणा मुळे त्यांचे कौतुक होत आहे.