Thursday, November 28, 2024

/

येळ्ळूर येथे अधिकाऱ्यांची पाहणी

 belgaum

गुरुवारी राज्य सरकारने दिलेल्या बुलेटीन मध्ये येळ्ळूर तालुका बेळगाव येथील एका 45 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. या परिसरातील निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नुकतीच तहसीलदार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.

बेळगाव तालुक्यात बेळगुंदी, हिरेबागेवाडी, पिरनवाडी आणि येळूर या गावामध्ये कोरोना लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे आता संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून सर्व ठिकाणी सुरक्षित अंतर आणि निर्बंध लादण्यात येत आहेत.

Yellur village
Yellur village officer visited

येळ्ळूर येथे तहसीलदार कुलकर्णी, तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लीकार्जुन कलादगी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी अरुण नाईक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी गावची पाहणी करून तेथील समस्या निवारण्यासाठी सूचना केल्या आहेत.

येळ्ळूर गावात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना अधिकाऱ्यांनी मात्र आपली कस लावली आहे. त्यामुळे तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकार्‍यांनी सुरक्षित अंतर ठेवून गावातील संबंधित रुग्ण आणखी कोणाच्या संपर्कात आला आहे का याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आरोग्य तपासणीची मोहीम राबविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.