सध्या कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. मात्र अनेक जण या परीक्षेची धास्ती घेताना दिसतात. मिळालेला वेळ अभ्यासात घालवण्यात अनेक विद्यार्थी दंग आहेत. मात्र सदाशिवनगर येथील एका विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी अभ्यास कर असे सांगितल्यावर आत्महत्या करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली माजले आहे.
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सुजल राजू कळीगुद्दी ( वय १६ , रा . सदाशिवनगर ९ वा क्रॉस ) असे त्याचे नाव आहे. सतत मोबाईल घेऊन बसणाऱ्या मुलग्याला पालकांनी दहावीचे वर्ष आहे, थोडा अभ्यास कर असे सांगितल्याने त्याने आत्महत्या केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुजल हा यंदा दहावीला होता. सध्या लॉकडाऊनमुळे दहावीची परीक्षा पुढे गेली आहे. सुजल सतत मोबाईल घेऊन गेम खेळत बसायचा. परीक्षा पुढे गेली असली तरी ती होणार आहे. त्यामुळे थोडासा अभ्यासाकडे लक्ष दे असे त्याला पालकांनी सांगितले. परंतु याच रागातून सुजलने त्याच्या बेडरूममध्ये जाऊन गळफास घेतला. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास तो बेडरुममध्ये गेला तेव्हा त्याच्या घरचे पटांगणात बसले होते.
तो बेडरूममध्ये झोपला असेल असेल असे समजून नंतर घरचेही झोपी गेले. परंतु रात्रीच्या वेळी त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. रविवारी सकाळी एपीएमसी पोलिस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पालकांनी दिलेल्या फिर्यादीत त्याने अभ्यासावरून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.