विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहीलेल्या दहावी परीक्षेचे वेळापत्रक 4 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे . तसेच 9 ते 20 मे या काळात परीक्षा घेण्याची तयारी शिक्षण खात्याने सुरू केली आहे .
27 मार्चपासून दहावीची वार्षिक परीक्षा सुरू होणार होती मात्र लाकडाउन जाहीर करण्यात आल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा कधी होणार याची चिंता लागून राहिली आहे .मात्र शिक्षण मंत्री एस सुरेशकुमार यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर 4 मे रोजी परिक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल तसेच 9 मे पासून परीक्षा घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे .
दहावी परीक्षेचा बार उडणार तरी कधी
कोरोना संकटामुळे दहावी परीक्षा काही काळापुरता पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांतून परीक्षा कधी होणार याकडे तर्कवितर्क लावण्यात येत आहे. नुकतीच शिक्षणमंत्र्यांनी 4 मे रोजी दहावी परीक्षा होण्याबाबत निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र अजूनही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
परीक्षा आता होणार उद्या होणार या विवंचनेत विद्यार्थी अडकले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहीलेल्या दहावी परीक्षेचे वेळापत्रक 4 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच 9 ते 20 मे या काळात परीक्षा घेण्याची तयारी शिक्षण खात्याने सुरू केली आहे. 27 मार्चपासून दहावीची वार्षिक परीक्षा सुरू होणार होती. मात्र लॉक डाउन जाहीर करण्यात आल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा कधी होणार याची चिंता लागून राहिली आहे. मात्र शिक्षण मंत्री एस सुरेशकुमार यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर 4 मे रोजी परिक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल तसेच 9 मे पासून परीक्षा घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी चार दिवसांपूर्वी राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. तसेच परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी अशी सूचना केली होती. परीक्षेला अधिक विलंब होऊ नये याकडे शिक्षण खाते लक्ष देत असून कोरोनामुळे दीड महिन्यापेक्षा अधिक दिवस परीक्षा लांबणीवर पडल्याने विद्यार्थी दडपणाखाली आहेत. त्यामुळे लॉकडाउन संपताच परीक्षा घेण्यासाठी शिक्षण खात्याने तयारी सुरू केली असून याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.
परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी काही दिवस शाळा सुरु ठेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा विचार शिक्षण खात्याने सुरू केला होता. मात्र परीक्षेला अधिक दिवस विलंब होऊ नये यासाठी शाळा न भरविता परीक्षा घेण्याचा विचारही शिक्षण खात्याने सुरू केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता इतर गोष्टींकडे लक्ष न देता अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक असे मत व्यक्त होत आहे.