बेळगाव एपीएमसी येथील भाजी मार्केटमध्ये होत असलेल्या गर्दीचा विचार करून होलसेल भाजी मार्केट तीन ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. शेतकऱ्यांची आणि ग्राहक तसेच व्यापाऱ्यांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून हे उद्देश आखण्यात आले होते. मात्र सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले असले तरी नव्याने सुरू झालेल्या भाजी मार्केटमध्ये त्याचा भाव दिसून येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहर तसेच ग्रामीण भागातील लॉक डाऊन पसरला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून खरेदी विक्री करावी असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र याचे सोयरसुतक ग्राहकांना दिसून येत नसल्याचे दिसून येत आहे. नव्याने सुरू झालेल्या बी. एस. येडीयुरापा मार्गावरील मिली हॉल जवळ नागरिकांनी गर्दी केली होती. दररोज अशी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव शहराच्या तिन्ही ठिकाणी आता गर्दी वाढू लागली आहे. मात्र सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तेथे नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. या दृष्टिकोनातून भाजी खरेदी विक्री तसेच इतर ट्रान्सपोर्ट ला ही मदत होत असली तरी सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी मार्केटिंग करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तीन ठिकाणी झालेल्या भाजी मार्केटमध्ये भाजी शेतकरी मोठ्या प्रमाणात आणत आहेत. त्यामुळे गर्दीचा ओघ वाढला आहे. असे येथील भाजी मार्केटमध्ये गर्दी होत असल्याने तीन ठिकाणी भाजी मार्केट हलविण्यात आले आहे. मात्र पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनीही नागरिकांच्या पुढे हात टेकले आहेत. त्यामुळे यापुढे तरी सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करावी व सुरक्षित अंतर ठेवून भाजी खरेदी विक्री सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.