Wednesday, January 15, 2025

/

शिवजयंती घरीच साजरी करावी सर्व शिवजयंती महामंडळांच्या आव्हान

 belgaum

कोरोना या विषाणूच्या वाढत्या पादुर्भामुळे संपूर्ण जगावर महामारीचे संकट ओढावलेले आहे. तसेच कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान मान नरेंद्र मोदी व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे अनिवार्य आहे. या अनुषंगाने येथील शहर मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ, शहापूर विभागाच्या वतीने यावर्षीची शिवजयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दोन्ही मध्यवर्ती संघटनेच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीच्या शहर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी व शहापूर शिवजयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी हे आवाहन केले आहे.

बेळगावसह संपूर्ण सीमाभागात शिवजयंती उत्सव परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेला मोठ्या प्रमाणात व चैतन्यमय वातावरणात दरवर्षी साजरी केली जाते. यंदा हा दिवस २५ एप्रिल रोजी आहे. या शिवजयंतीनिमित्त दरवर्षी सजीव चित्ररथांची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव व परिसरातील तसेच जवळच्या गोवा व महाराष्ट्र राज्यातील शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र या वर्षीच्या कोरोना विषाणूमुळे सारे काही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र व राज्य सरकारने केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सामाजिक अंतर ठेवणे व इतर नियमांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांना सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य असून ही एक देशसेवाच आहे. त्यामुळे यंदाची शिवजयंती सर्व शिवभक्तांनी आपापल्या घरी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे किंवा मुर्तीचे पूजन करुन साजरी करण्यात करावी. तसेच चित्ररथ व मिरवणूक यापासून दूर राहावे, असे आवाहन दोन्हीही मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाने केले आहे.

सीमाभागातील परंपरेनुसार शिवजयंती उत्सवावर करोनाचे सावट.

सीमाभागात 3 मे पर्यंत संचारबंदी लागू असल्यामुळे आणि कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर शिवजयंती. नागरिकांनी घरी राहूनच साधेपणाने जयंती साजरी करावी, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असून गर्दी टाळणं गरजेचं आहे. त्यामुळे सीमाभागातील जनतेने यंदा शिवजयंती घरातच साधेपणाने साजरी करावी, असं आवाहन शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे कार्याध्यक्ष सुनील जाधव यानी केले आहे.

कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या साथ रोगाला रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, मात्र संचारबंदी 3 मे पर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करण्यासाठी घराबाहेर पडू नका, संचारबंदी असल्यामुळे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे काही शिवजयंती मंडळा कडून नियोजन सुरूआहे सामाजिक विलगीकरण पाळून गर्दी जमा होईल, असा उपक्रम घेऊ नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. असे महामंडळाचे सरचिटणीस जे.बी.शाहपुरकर यांनी सांगितले.

25 एप्रिलला आपल्या घरावर भगवा झेंडा लावा. बाहेर जाहीर कार्यक्रम करू नका. चित्ररथ मिरवणूक काढू नका. घरी राहा. पुरणपोळी करून घरीच शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करावी, असं महामंडळाचे प्रसारमाध्यम प्रमुख रवींद्र जाधव यांनी म्हटलं आहे. यंदा गुढीपाडव्याच्या शोभायात्रा,महावीर जयंती बाबासाहेब आंबेडकर, रामनवमीचे कार्यक्रमही रद्द झाल्याचंही सांगितले

शिवजयंतीनिमित्त जमा केलेला निधी सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच करोना रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या समूहाला द्यावा. त्याचं संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. अशा लोकांची चूल विझणार नाही, याची काळजी घ्यावी. या गरजू लोकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात, असं सांगतानाच यंदाची जयंती आपण घरातच साजरी करावी. घरातील जयंतीचे फोटोज, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून इतरांनांही जयंती घरातून साजरी करण्यासाठी आवाहन करावे, असे महामंडळाचे उपाध्यक्ष रवी निर्मळकर यांनी सूचना केल्या आहेत.

कोरोनाचं संकट हे वैश्विक संकट आहे. त्यामुळे संपूर्ण जगात मृत्यूचं तांडव झालं आहे. आपल्या राज्यातही या रोगानं हातपाय पसरले असून गर्दी टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. त्यामुळे यंदाची जयंती घरीच साजरी करावी. आपल्या एका चुकीमुळे कोणताही अनर्थ ओढवू देऊ नका आणि कुणाच्याही हाती टीकेचं आयतं कोलीत देऊ असे माळी गल्लीतील शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष मेघन लगरकांडे यांनी सांगितले.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात 3 मे पर्यंत संचारबंदी लागू आहे. लोकांनी गर्दी करू नये, घरीच रहावे, असे आवाहन सरकारतर्फे केले जात आहे. तरी सर्व नागरिकांनी 25 एप्रिलला घराबाहेर न पडता घरीच राहून शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन चवाट गल्लीतील शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष अनंत बामणे यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.