बेळगाव जिल्ह्यात 51 अश्या वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता खानापूर तालुका पोलिस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन सर्वत्र नाकेबंदी हाती घेतली आहे. दोन दिवसापूर्वी खानापूर शहर पूर्णतः लॉक डाऊन करण्यात आले सकाळच्या प्रहरी केवळ दुपारी बारा वाजेपर्यंत बाजाराला मुभा दिली जात आहे. त्यानंतर शहर परिसरात शुकशुकाट पसरत आहे. बेळगाव भागातील कोरोना व्हायरस वाढती धास्ती लक्षात घेता बेळगाव महामार्गावरील सीमेवर प्रभूनगरनजीक नवा चेक पोस्ट उभारून बेळगाव भागातून खानापुरवर करडी नजर ठेवण्यात आली आहे . बेळगाव तालुक्यातून खानापूर तालुक्यात तसेच खानापूर तालुक्यातून बेळगाव तालुक्यात संपूर्ण प्रवेश बंद करण्यात आला आहे .
खानापूर पोलिसांकडून या चेकपोस्टवर चोवीस तास पहारा ठेवला जात असून पासधारक वाहनांशिवाय कोणालाही आत व बाहेर प्रवेश दिला जाणार नाही . बेळगाव तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे . बेळगाव शहर आणि तालुक्यात अनेक ठिकाणी सील डाऊन तसेच हॉटस्पॉट म्हणून जागा निश्चिती करण्यात आली आहे अशा परिस्थितीत अनेकजण सुरक्षित वास्तव्यासाठी बेळगाव परिसरातून खानापुरातील नातेवाईकांकडे येण्यासाठी करत आहेत.
यावर उपाय म्हणून दोनच दिवसापूर्वी पोलिसांनी खानापूर शहरात प्रवेश करणारे १९ रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत . त्यानंतर आता महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष केंद्रित केले असून काटगाळी क्रॉस व प्रभूनगर या दरम्यान असलेल्या बेळगाव – खानापूर तालुक्याच्या सीमेवर तात्पुरता चेक पोस्ट उभारण्यात आला आहे . सरकारी वाहने , जीवनावश्यक वस्तूंची ने – आण करणारी वाहने आणि पास धारकांनाच महामार्गावरून वाहतुकीसाठी प्रवेश दिला जाणार आहे पोलिस निरीक्षक सुरेश शिंगी आणि उपनिरीक्षक बसनगौडा पाटील यांनी आज चेक पोस्टला भेट देऊन तेथील पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त संदर्भात सूचना केल्या .
याठिकाणी बेळगाव खानापूर कडे अथवा खानापूर बेळगाव कडे जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. एकंदरीत पोलीस प्रशासनाने लॉक डाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.