अचानक कोरोनाचे देशात संकट वाढले आणि जे काही निर्णय घ्यावे लागले ते निर्णय सध्याच्या दृष्टिकोनातून योग्य आहेत. मात्र याचा परिणाम शाळा महाविद्यालयांवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. नेमके अजुन किती दिवस या कोरोनाशी झुंजावे लागणार या विवंचनेत असताना राज्य सरकारने ऑगष्ट महिन्यात शाळा व कॉलेज सुरू होण्याची शक्यता वर्तविली आहे.
नुकतीच राज्य शिक्षण खात्याकडून याबाबतचा विचार सुरू आहे. ज्या काही परीक्षा अर्धवट राहिलेले आहेत त्या ऑगष्ट महिन्यानंतर घेण्याचा आदेश देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबतचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यामुळे नेमकी शाळा कधी चालू होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत तर पहिली ते सातवी आणि नववी पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्ग करावे असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे महत्त्वाचे म्हणजे आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार याकडे लक्ष लागून राहिल्याने आणि राज्य सरकारने नुकतीच ऑगष्ट महिन्यात शाळा कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्याकडे हालचाली गतिमान केल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
शिक्षण खात्याला याबाबतच्या सूचना लवकरच देणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. मात्र कोरोनाचा विळखा वाढत चालला असून तो संपेपर्यंत तरी नेमका शाळा व कॉलेज याच महिन्यात सुरू करता येतील असे सांगता येणार नाही. अजूनही राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत शाळा-कॉलेज ऑगष्ट महिन्यात सुरू होण्याची शक्यता राज्य सरकारने वर्तविल्याने मोठा गोंधळ उडण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र जोपर्यंत कोरोनाचे संकट संपत नाही तोपर्यंत शाळा कॉलेज सुरू करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे अनेक जाणकारातून बोलले जात आहे.