सी आर पी एफ जवान सचिन सावंत याने केवळ मास्क घातला नाही म्हणून त्याला बेड्या ठोकून अमानुष मारहाण करणारे सदलगा पोलिसावर निलंबित करण्यात आले आहे.या घटनेला जबाबदार धरत सदलगा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांना निलंबित करण्यात आले आहे.
उत्तर विभागाचे आय जी पी राघवेंद्र सुहास यांनी ही कारवाई केली असल्याचे प्रसिद्धी पत्रक दिले आहे.सध्या या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी सुरू असून चौकशी पूर्ण होताच सर्व माहिती देणार असल्याचे देखील आयजी पी यांनी म्हटले आहे.केंद्रीय असो किंवा राज्य असो सर्व पोलीस एकच आहेत असे देखील त्यांनी नमूद केलंय.
सी आर पी एफ कमांडो सचिन याला बेड्या ठोकलेल्या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करा असे आदेश गृहमंत्री बसवराज बोंममई यांनी बजावले होते.या शिवाय सी आर पी एफ डी जी पी यांनी तर कर्नाटक डी जी पी याना पत्र लिहून गुन्हा मागे घ्या अशी मागणी केली होतो या शिवाय जलसंपदा मंत्री रमेश जारकिहोळी यांनो सी आर पी एफ जवानाला न्याय देण्याची मागणी केली होती.