रोटरी क्लब आॅफ बेळगावने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा दाखवून देताना शुक्रवारी पंतप्रधान कोरोना सहाय्य निधीला 1 लाख रुपयांची मदत देऊ केली आहे.
रोटरी अन्नोत्सवाच्या उपक्रमाद्वारे जमा झालेल्या निधीतून ही मदत करण्यात आली आहे. दरवर्षी रोटरी अन्नोत्सवाच्या माध्यमातून समाजकल्याणासाठी निधी जमा केला जातो. यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी या निधीचा विनियोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जीवन खटाव यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या संचालकांच्या बैठकीत उपरोक्त निधी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी क्लबचे सचिव प्रमोद अग्रवाल व अन्य उपस्थित होते.
या व्यतिरिक्त रोटरी क्लबतर्फे कोरोना विरुद्ध या लढ्यासाठी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना मास्क आणि प्रोटेक्टिव्ह सूट असे सुमारे 5 लाख रुपयांचे साहित्य देण्याची तयारी करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त रोटरी क्लबचे अनेक सदस्य वैयक्तिकरित्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.