बेळगाव शहर आणि परिसरात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 3 आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याची गरज आहे. तसेच जे रुग्ण निगेटिव्ह आढळले आहेत त्यांची पुन्हा एकदा तपासणी करून नागरिकातून होणारी भीती गायब करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले आहे. या आव्हानाला तातडीने प्रतिसाद द्या असेदेखील त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची घटना घडल्यामुळे लॉकडाऊनकडे अधिक कडकपणे पाळला जावे. रविवारी कोविड -19 संसर्ग नियंत्रणासंदर्भात सिटी हॉलमध्ये वरिष्ठ अधिकारयांची बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते अधिकाऱ्याना सूचना करत होते.
आरोग्य विभागाच्या अधिकऱ्याना त्यांनी असेही सांगितले की, ज्यांची आधीच नकारात्मक प्रतिक्रिया आहे त्यांनी काही दिवसांनी पुन्हा तपासणी करावी.
ग्रामीण भागातील लोक सामाजिक अंतर राखत आहेत. शहरी भागात सामाजिक याचे भान ठेवण्याची गरज आहे. याआधीच मुस्लिम बांधवांच्या सर्व प्रतिनिधींची बैठक बोलविली असून त्यांना लॉक डाऊन काळात सर्व व्यवहार बंद करण्याचे गरज असल्याचे पटवून दिले आहे. त्यामुळे यापुढे आणखी काही दिवस असेच चालणार असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर यास बी बोमनहळी, जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी कायदा व सुव्यवस्थेविषयी मंत्री यांना माहिती दिली. शहर पोलिस आयुक्त बी.एस. लोकेश कुमार, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.राजेंद्र के.व्ही. यांच्यासह इतर अधिकारी बैठकीस उपस्थित होते.