बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ ओळखल्या जाणाऱ्या रविवारपेठ मधील काही मूठभर व्यापाऱ्यांनी दमदाटी करून केवळ आपलीच दुकाने उघडी ठेऊन उखळ पांढरे करून घेण्याचा उद्योग दोन दिवसापासून सुरू केला होता पण बाजारपेठेतील सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या मूठभर व्यापाऱ्यांचा डाव हानुन पाडला.
गेल्या दोन दिवसापासून बाजारात फक्त व्होलसेल दुकाने सायंकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत चालू ठेऊन आपले उखळ पांढरे करून घेत होते त्यामुळे बाजारपेठेतील अन्य व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती.
शुक्रवारी नरगुंदकर भावे चौकात रविवार पेठेतील सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन मूठभर व्यापाऱ्यांचा बाजारपेठ आपल्याचं हातात ठेवण्याचा डाव हाणून पाडला.आज जमलेल्या व्यापाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन आपली बाजू मांडली त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी रविवार पेठेतील सगळ्या व्यापाऱ्यांना संध्याकाळी 6 ते 11 पर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी दिली.
ग्राहकांकडून सामानाची यादी मागवून घेऊन ग्राहकांना घरपोच सामान पोचवण्याची व्यवस्था केली गेली आहे अशी माहिती मार्केट मधील व्यापारी अजित सिद्दण्णावर यांनी बेळगाव live शी बोलताना दिली .
मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी, खडे बाजार ए सी पी चंद्रपप्पा यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी नरगुंदकर भावे चौकात व्यापाऱ्यांशी चर्चा केली.