बेळगाव शहरात कोरोना बाधिताची संख्या वाढत असल्याने खडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बरोबर सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून रविवार पेठ बुधवार दि. 22 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगाव शहरात एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या सहावर जाऊन पोहोचली आहे. याच अनुषंगाने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली गतिमान करण्यात आले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर रविवार पेठ येथे होणार्या गर्दीचा विचार करून रविवार पेठ बुधवार दिनांक 22 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
बेळगाव शहरातील कॅम्प परिसरामध्ये चार रुग्ण माळ मारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 1 आणि एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एक रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. शहरात एकूण सहा रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रविवार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेल्या पोलिस प्रशासनाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे दुकानदारांनी रविवार पेठकडे फिरकू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
मागील दोन दिवसांपासून ज्याप्रमाणे लॉक डाऊन काटेकोरपणे पाळण्यात आले आहेत त्याप्रमाणेच आता यापुढे देखील शहरात बुधवारपर्यंत काटेकोरपणे लॉक डाऊन पाळण्यात येणार आहे.
याबाबत लवकरच पोलीस प्रशासन आणखी एक बैठक घेऊन कडेकोट पोलिस बंदोबस्त कसा ठेवता येईल व कशा पद्धतीने कोरोनवर मात करता येईल यावर निर्णय घेणार आहेत. या साऱ्या प्रकारामुळे मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगावात कोरोनाची संख्या वाढतच आहे. अजूनही काही अहवाल येणे बाकी आहे. या दृष्टिकोनातून आता आरोग्य खातेही योग्य त्या खबरदारी घेत असल्याचे सांगण्यात आले.