कोरोना बद्दल जनतेत धास्ती निर्माण झाली असून घबराटीचे वातावरण पसरले आहे.होम क्वांरंटाईन करण्यासाठी शहरातील काही लॉज जिल्हा प्रशासनाने निश्चित केली आहेत.पण त्या लॉजच्या आबाजूच्या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी त्या लॉजमध्ये क्वांरंटाईन करण्यास विरोध केला आहे.
या लॉजच्या परिसरात नागरी वस्ती असून येथे ठेवून आम्हाला मारणार काय असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.शहराबाहेर सुवर्ण सौध आहे,अन्य सरकारी इमारती आहेत.गावाबाहेरच्या इमारतीत त्यांना क्वारंटाईन करावे असे नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत नागरी वस्तीतील लॉज मध्ये क्वारंटाईन करायला देणार नाही असा निर्धार चवाट गल्लीतील नागरिकांनी केला आहे. काल मंडोळी येथील हॉस्टेल मध्ये 24 क्वांरंटाइन ना ठेवण्यास विरोध केल्याने प्रशासनाने त्यांच्यावर शहरात उपचार केले होते आता शहरातील लॉज मध्ये देखील उपचार करण्यासाठी विरोध वाढत आहे.