Monday, January 27, 2025

/

पांगुळ गल्लीवासियांची हात जोडून विनंती..ते शहरात नकोत

 belgaum

कोरोना संशयितांना कोरन्टाईनसाठी शहरातील लॉज किंवा हॉटेल्समध्ये ठेऊ नये, या मागणीने सध्या जोर धरला आहे. सोमवारी पांगुळ गल्ली येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून कोरोना संशयित रुग्णांचे शहरात कोरन्टाईन करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच संबंधित रुग्णांची शहराबाहेर व्यवस्था केली जावी, अशी प्रशासनाकडे हात जोडून विनंतीही केली.

बेळगाव शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत 7 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने शहरात जास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे होम कोरन्टाईन करण्यात आलेल्या लोकांना लॉज किंवा हॉटेल्समध्ये भरवस्तीत ठेवण्यास नागरिकांचा विरोध होत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जागा कमी पडत असल्याने कोरोना संशयितांचे शहरातील लॉज आणि हॉटेल्समध्ये कोरन्टाईन केले जावे, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. तथापि प्रशासनाच्या या निर्णयास काल रविवारी चव्हाट गल्ली, खडेबाजार व शेट्टी गल्ली परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला. यामुळे या भागात कांही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आता आज सोमवारी पांगुळ गल्लीतील समस्त नागरिकांनी कोरन्टाईन रुग्णांना शहरातील मध्यवर्ती भागातील हॉटेल्स व लॉजमध्ये ठेवण्यास विरोध दर्शविला आहे.

यासाठी सोमवारी पांगुळ गल्लीतील समस्त नागरिक रस्त्यावर उतरले होते. या सर्वांनी कोरन्टाईन व्यक्तींना शहराच्या दाट लोकवस्तीच्या मध्यवर्ती भागातील लॉज अथवा हॉटेल्समध्ये ठेवू नये, संबंधितांची शहराबाहेर कोठेही चांगली व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी केली. गोंधळ न घालता रस्त्यावर सामाजिक अंतर ठेवून उभे राहिलेल्या या सर्व नागरिकांनी हात जोडून उपरोक्त विनंती केली हे विशेष होय. पांगुळ गल्लीत रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांमध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.

 belgaum
Pangul galli
Pangul galli

कोरन्टाईन व्यक्तींना लाॅज अथवा हॉटेल्समध्ये ठेवल्यास शहराच्या दाट लोकवस्तीच्या या मध्यवर्ती भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित संशयितांना लॉज अथवा हॉटेलमध्ये नजर कैदेत ठेवण्यात येणार असले तरी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी त्यांच्या संपर्कात येणार आहेत. यापैकी एकाकडून जरी अनावधानाने चूक झाली तर त्याची किंमत शहरातील नागरिकांना चुकवावी लागणार आहे. ते संबंधित कोरन्टाईन दिलेल्या लोकांची शहराबाहेरील कोणत्याही ही जागी चांगली व्यवस्था करावी. तसेच आमदार अॅड. अनिल बेनके, आमदार अभय पाटील आणि खासदार सुरेश अंगडी यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालावे. तसेच कोरन्टाईन रुग्णांना शहराबाहेर ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पांगुळ गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक व युवा नेते नितीन भातकांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

गल्लीतील कविता कुंडेकर या महिलेने देखील खडेबाजार परिसरातील क्लोज अथवा हॉटेल्समध्ये कोरोना संशयित रुग्णांना कोरन्टाईनसाठी ठेवू नये. त्याला आमचा सक्त विरोध आहे, असे स्पष्टपणे सांगितले. याप्रसंगी पांगुळ गल्लीतील सर्व युवक मंडळे महिला मंडळ पंचकमिटी आणि गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.