कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील 170 जिल्हे “हॉटस्पॉट जिल्हे” म्हणून घोषित केले आहे यामध्ये कर्नाटक राज्यातील बेळगावसह 8 जिल्ह्यांचा समावेश आहे.
देशातील हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये कर्नाटक राज्यातील बेळगावसह बंगळुरू शहर, म्हैसूरू, मंगळुरू, बिदर, गुलबर्गा, बागलकोट आणि धारवाड जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात एकूण 279 कोरोना पाॅझेटिव्ह रुग्ण आढळून आले असून यापैकी बेळगाव जिल्ह्यातील रुग्ण संख्या 19 आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हा राज्यात कोरोनाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील हॉटस्पॉट जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे
सरकारने हॉट स्पॉट जिल्ह्यांमध्ये सील डाऊनचा आदेश जारी केल्यास कोरोना प्रादुर्भाव असलेला भाग सील केला जाणार आहे. या सील डाऊनच्या कालावधीत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. सील डाऊन म्हणजे 100 टक्के बंद असणार असून दूध, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्यास नागरिकांना सरकारी सहाय्यवाणीशी संपर्क साधून संबंधित वस्तू ऑनलाईन मागवाव्या लागणार आहेत.
सील डाऊन असलेल्या भागात ऍम्ब्युलन्स आणि पोलिस वाहन खेरीज कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही सील डाऊन भागात जाण्यास बंदी असेल.