सध्या आंतरराज्य वाहतूक बंद आहे. त्यामुळे हैदराबाद, पुणे, मुंबई या ठिकाणी नियमित पाठवली जाणारी भाजी पाठवता येत नसल्यामुळे भाजीपाला मोठया प्रमाणावर शिल्लक राहिला आहे.
आज 25 हुन अधिक ट्रक मिरचीची आवक झाली आहे. नेहमी बेळगावची ही मिरची हैदराबाद, मुंबई ,पुणे येथे मोठ्या प्रमाणावर पाठवली जाते. पण वाहातुक बंद असल्यामुळे तीन हजार पोती मिरची शिल्लक राहिली.केवळ चार रुपये किलो दराने मिरची घ्या म्हणजे देखील खरेदीदार नाहीत.
केवळ मिरचीच नव्हे तर कांदा दर देखील आज घसरला. शनिवारी 34 रु किलोने विकला गेलेला कांदा बुधवारी 17 रुपये किलोने विकला गेला. आज भाजी मार्केटमध्ये 175 ते 200 गाड्या कांदा आवक झाली होती.
बेळगावच्या एपीएमसी व्होलसेल भाजी मार्केट मध्ये भाज्यांची आवक मोठया प्रमाणावर झाली होती मात्र मध्ये टोमॅटो काकडी मेथी पालक मिरची फ्लावर नवलकोल कॅबिज पाले भाज्या यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली होती निपाणी सह आजू बाजूच्या गावातील व्यापारी खरेदीसाठी आले होते त्यांनी बेळगाव भाजी मार्केट मधून मोठ्या प्रमाणावर भाजीची खरेदी केली.