Wednesday, November 20, 2024

/

“या” आमदारांनी जागेवरच खरेदी केली तब्बल 30 टन कलिंगडं

 belgaum

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊनच्या काळात जनहितार्थ अहोरात्र सेवा बजावणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, पोलीस आदी “रियल हिरोज”ना यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी एक आगळी भेट देण्याबरोबरच एका शेतकऱ्याचे मोठे आर्थिक संकट दूर केल्याची घटना रविवारी घडली. जेंव्हा त्यांनी तब्बल सुमारे 30 टन तयार कलिंगडं जागेवरच खरेदी केली.

देशव्यापी लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून आपल्या यमकनमर्डी मतदार संघातील जनतेचे हाल होऊ नयेत यासाठी आमदार सतीश जारकीहोळी सातत्याने प्रयत्नशील आहेत. यासाठी गेल्या 15 दिवसात त्यांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढताना मास्क, सॅनिटायझर, जीवनावश्यक वस्तू, औषधे आदींचे शेकडो लोकांमध्ये वाटप केले आहे. या अनुषंगाने रविवारी आमदार सतीश जारकीहोळी यांनी हेब्बाळ जिल्हा पंचायत व्याप्तीतील ऊळागड्डी खानापूर या गावाला भेट दिली.

Satish jarkiholi
Satish jarkiholi

ऊळागड्डी खानापूर भेटीप्रसंगी आमदार जारकीहोळी यांनी प्रथम एका पेरुच्या बागेला भेट देऊ पेरूची चव घेतली. त्यानंतर त्यांनी नजीकच असलेल्या कलिंगडाच्या शेतात प्रवेश केला. त्यावेळी संबंधित शेत मालकाने आमदार सतीश जारकीहोळी यांचे स्वागत करून त्यांना आपल्या शेतातील कलिंगडे चाखावयास दिले. तसेच आपल्या कलिंगडाच्या शेतीची माहिती देऊन यंदा जवळपास 30 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले असल्याचे सांगितले. तथापि लॉक डाऊनमुळे दुर्देवाने सध्या कलिंगडाला कवडीमोल किंमत असल्याने आपल्याला फार मोठा आर्थिक फटका बसणार असल्याची माहितीदेखील संबंधित शेतकऱ्यांने आमदारांच्या कानावर घातली.

तेंव्हा चाखायला दिलेल्या कलिंगडाची सुमधुर चव पाहून आमदार सतीश जारकीहोळी इतके खुश झाले की त्यांनी जागेवरच शेतातील जवळपास 30 टन कलिंगडांची खरेदी केली. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना सदर सर्व कलिंगडं डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कामगार आदी रियल हिरोजमध्ये वाटून टाकण्यास सांगितले. आमदार सतीश जारकीहोळी यांच्या या कृतीमुळे भारावून गेलेल्या त्या शेतकऱ्यांने आपल्याला मोठ्या आर्थिक संकटातून वाचवल्याबद्दल आमदारांना शतशः धन्यवाद दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.