मी माझं आणि माझ्या स्वतःसाठी अश्या स्वार्थी विचारात हरवलेल्या लोकांच्या कडून बेळगावात सोशल डिस्टन्सचे तीन तेरा वाजवले जात आहे.
प्रशासन जीव तोडून सांगतंय नियम पाळा, पण स्वार्थात हरवलेले लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पेन्शनचे, धान्याचे, दुधाचे व जीवनावश्यक वस्तूच्या वितरणाचे नियोजन व्यवस्थित चालू आहे.
कुणालाही गडबड करण्याची काहीही आवश्यता नाही. जिथून पेन्शनच वाटप होत असेल किंवा रेशन दुकानात धान्य वितरित होत असेल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दररोज ठराविक लोकांना बोलवून पेन्शन व धान्य वितरित करण्याची गरज आहे. कारण काही ठिकाणी नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत.
वरील फोटोत बाजार गल्ली वडगांव मधील दृश्ये आहेत जिथं शेकडो वृद्ध गरजू महिला पेन्शन साठी रांगेत उभ्या आहेत ना चेहऱ्यावर मास्क, ना एकमेकांत सुरक्षित अंतर. तीन कोरोना रुग्ण आढळलेल्या सध्या हाय अलर्ट वर असलेल्या बेळगावसाठी ही धोक्याची घंटा आहे.जर का येणाऱ्या दिवसांत जनतेने प्रशासनाचे ऐकलं नाही तर बेळगावात कोरोना पोजिटिव्हची संख्या वाढणार आहे.