पुऱ्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे अनेकजण भयभीत झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण भारत देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत साऱ्यांनीच मास्क वापरा अशा अफवा उठवण्यात आले आहेत. मात्र ज्यांना ताप सर्दी खोकला अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी मास्कचा वापरावे अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे मास्क ज्यांना गरजेचा आहे त्यांनीच वापरावे असेही एका दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे.
बऱ्याच ठिकाणी नोंदवले गेले आहे की बरीच विभागीय स्टोअर, दुकाने, आस्थापने लोकांना मास्क घालायला आग्रह करतात. मात्र तसे दंडक प्रशासनाने घातले नाही. ज्यांना खरेच मास्कची आवश्यकता आहे त्यांनी ते वापरावे. ज्यांना त्याचा त्रास होत आहे त्यांनी वापरू नसले तरी चालतंय असा असा सल्ला आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने देण्यात आला आहे.
विविध परिपत्रके आणि संप्रेषणांच्या माध्यमातून सरकारने मुखवटा कोणाला घालायचा या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे. भीती म्हणून मास्क वापरू नका ज्यांना सर्दी खोकला यासारखा आधार सुरू झाल्यास त्यांनीच मास्कचा वापर करावा इतरांना मास्क वापरण्याची बंदी घालू नये. याची भीतीही अनेकांना दाखवू नये असा सल्ला त्यांनी दिला आहे.
नियम म्हणून प्रत्येकाने मुखवटा घालण्याची गरज नाही. एखाद्या व्यक्तीला फक्त तेव्हाच मुखवटा घालायचे आहे जेव्हा सर्दी किंवा खोकला, ताप किंवा इतर श्वसन समस्येची लक्षणे झाल्यास, कोविड -19 संशयित, पुष्टी झालेल्या रूग्ण, श्वसनाच्या लक्षणे असलेल्या रूग्णांनी याचा वापर करावा.
अशा रुग्णांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते भेट देणारे आहेत. याचबरोबर जे रुग्ण आढळतात आणि त्यांच्यावर जे डॉक्टर्स नर्सेस उपचार करतात यांनीदेखील मास्कचा वापर करावा असेही ही कुटुंबांनी आरोग्य कल्याण खात्याने स्पष्ट केले आहे. याबाबत संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्यांची ही गय केली जाणार नाही असे नमूद करण्यात आले आहे.