मद्यप्रेमींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शॉक दिला आहे.20 एप्रिल नंतर कर्नाटकातील एमएमएसआयएल मद्य दुकाने सुरू केली जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.पण लॉक डाऊन संपेपर्यंत मोदी यांनी मद्यविक्रीवर निर्बंध घातले आहेत.
या निर्बंधात राज्य सरकार कोणतेही बदल करू शकणार नाही.सगळ्या राज्यांना दारूबंदी पालन करावेच लागणार आहे.दारू विक्रीला प्रारंभ होणार म्हणून काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर ग्राहकांनी सामाजिक अंतर राखावे म्हणून चुना आणि रंगाचा वापर करून चौकोन देखील आखले होते.
काहींनी गर्दी झाल्यास रांग कशी लावायची याचीही तयारी केली होती पण मोदी यांच्या आदेशामुळे तळीराम आणि दारू दुकानदार यांची निराशा झाली आहे.याशिवाय तंबाखू आणि गुटखा विक्रीवर देखील 3 मे पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.गुटखा खाऊन कोठेही थुंकल्यामुळे कोरोना प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून तंबाखू आणि गुटखा विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.