स्वच्छ भारत आणि सुंदर भारत ही व्याख्या आता नागरिकांमुळे धूसर होत चालली आहे. स्वच्छता राखणे म्हणजे कोणता तरी गुन्हा केल्याचे काही नागरिकांना वाटू लागले आहे. त्यामुळे आता अनेक स्थानिक स्वराज संस्था रस्त्यावर थुंकणार्यांविरोधात कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे यापुढे गुटखा खाऊन रस्त्यावर करणाऱ्यांनो सावधान असे म्हणण्याची वेळ आली आहे.
निपाणी नगरपालिकेने राबवलेल्या एका धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांना चांगली अद्दल घडवण्यात आली आहे. निपाणी नगरपालिकेचे आयुक्त महावीर बोरगनांवर यांनी ही कारवाई केल्यामुळे आता निपाणी तसेच बेळगावमध्ये थुंकणाऱ्यांनो सावधान असे म्हणण्याची वेळ आली आहे.
निपाणी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम पाहणी दौरा काढण्यात आला होता. यावेळी एका व्यक्तीने गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकले. यावेळी आयुक्तांनी त्याला चांगलीच अद्दल घडली आहे. त्याचा शर्ट काढून त्याला पुसण्यात सांगितले. त्यामुळे एकच खळबळ माजली. या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
देशावर ओढवलेल्या कोरोना संकटामुळे अनेक जण घरात बसणेच पसंत केले आहेत. मात्र काहींची तलब महागात पडू लागल्याचे दिसून येत आहे. निपाणी नगरपालिकेमध्ये थुंकणाऱ्याला त्याच्याच शर्टाने पुसण्याच्या कारवाईमुळे गुटखा खाणाऱ्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. यापुढे असे जर रस्त्यावर थुंकण्यात आले तर अशीच कारवाई करू असेही यावेळी सांगण्यात आले.