कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे.पोलीस आणि आरोग्य खात्याला देखील सहकार्य करावे असे आवाहन केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या नेते मंडळीच्या बैठकित आवाहन केले. सरकारी विश्रामगृहात बोलविण्यात आलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत मंत्री सुरेश अंगडी बोलत होते.
निजामुद्दीन मरकज तबलीक कार्यक्रमाला जावून आलेल्याना आणि त्यांच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होत असल्याचे आढळून आल्याने त्यांना क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात येत आहे.क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.डॉक्टर आणि आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे असे मंत्री सुरेश अंगडी यांनी अलपसंख्याक समाजाच्या नेत्यांना बैठकीत सांगितले.
पवित्र रमजान महिन्यात घरातच प्रार्थना करावी.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लोकांनी घरातच सामाजिक अंतर राखून प्रार्थना,नमाज करण्यासंबंधी नेते मंडळींनी समाजात जागृती करावी असेही सुरेश अंगडी यांनी सांगितले.