लॉक डाऊन काळात जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाल्याने अनेकांना जीवन जगणे मुश्कील बनत आहे. अशा परिस्थितीत पोलिस प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तू वितरण करण्यासाठी काहीना पास वितरित करण्यात आले आहेत. मात्र याचा काहीजण गैरफायदा घेत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित पास धारकांवर तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
बेळगाव सध्या हॉटस्पॉटमध्ये नोंदविण्यात येणार आहे. याची दखल घेत अजून काही काळ लॉक डाऊन वाढविले आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी पोलिसानी स्तुत्य उपक्रम राबविला. मात्र काही जण याचा गैरफायदा घेताना दिसून येत आहेत. अशा नागरिकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
पोलीस प्रशासनाने सुमारे पाच हजार पास वितरित केले आहेत. मात्र या पासवर स्वाक्षरी करण्यात आली नाही. याचाच काहीजण गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे पाच हजार पासचे आता सात ते आठ हजार पर्यंत जाऊन पोचले आहेत. झेरॉक्स मारून तेच पास आपल्या वाहनावर चिकटवून सामाजिक कार्य करत असल्याचा आव आणणार्या संबंधितावर कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगाव जिल्हा रेड झोन मध्ये टाकण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे तितकेच मोल आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अनेकांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने पासचे वितरण केले आहे. मात्र काहीजण याचा दुरुपयोग करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासणी करून अशा पास धारकांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोरोनाच्या लढ्यात सहभागी होत असतानाच अनेकजण याचा दुरुपयोगही करत असल्याचे दिसून येत आहे.