बेळगाव तालुक्यात कोरोणाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता याची दक्षता घेण्याची गरज आहे. सर्व आरोग्य अधिकारी आणि तालुका अधिकाऱ्यांनी करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन आमदार महांतेश कवटगिमठ यांनी केले आहे.
नुकतीच तालुका पंचायत मध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले आहे. तालुका पंचायतीच्या महात्मा गांधीजी सभागृहात तालुका अधिकाऱ्यांची तसेच ग्राम विकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले आहे. यावेळी तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी उपस्थित होते.
बेळगाव तालुक्यात मुळे 5 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे त्या संबंधित गावातील तीन किलोमीटर अंतरापर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीला बाहेर सोडू नये अथवा बाहेरची व्यक्ती आत येऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. याचबरोबर तालुक्यात याचा फैलाव होऊ नये यासाठी तालुका आरोग्य अधिकार्याने तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांनी डॉक्टर आणि नर्स याची दक्षता घेण्याची गरज आहे, असे आवाहन देखील आमदार कवटगिमठ यांनी केले आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. बेळगाव जिल्ह्यात देखील याचे रुग्ण आढळल्याने मोठा गोंधळ माजला आहे. मात्र याला नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येकाने घरातच बसावे आणि याला आळा घालावा असे आवाहन देखील आमदार यांनी केले आहे. यावेळी तालुक्यातील बहुतेक अधिकारी बैठकीला उपस्थित होते.