बेळगाव शहरासह कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढली आहे. याची धास्ती आता पोलिसांबरोबरच आरोग्य खात्याने घेतली आहे. मात्र नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. वारंवार पोलीस सांगून देखील सुरक्षित अंतर ठेवण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने माळ मारुती पोलीसांनी नागरिकांना चांगलाच दणका दिला आहे.
न्यू गांधीनगर येथील फ्रुट मार्केट मध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी माळ मारुतीचे पोलीस निरीक्षक बी आर गडेकर यांनी सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करावी असे आवाहन केले. मात्र याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने त्यांना चांगलेच फटके बसले आहेत.
माळ मारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या फ्रुट मार्केटमध्ये वारंवार असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. नागरिकांना चांगलाच चोप दिला असून सुरक्षित अंतर ठेवून यापुढे खरेदी-विक्री करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याचा आता गांभीर्याने विचार करून नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून खरेदी विक्री करावी अन्यथा पुन्हा फटके बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पूर्ण देश कोरोनाशी झुंजत असताना अनेकांनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सध्या न्यू गांधीनगर येथे सुरू असलेल्या होलसेल भाजी मार्केट मध्ये नवीन फळफळावळ येताहेत. ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. मात्र या जागी आता सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनाने पोलिसांनी प्रयत्न केले. याचा फायदा झाला नसल्याने पोलिसांनी नागरिकांना चांगलाच चोप दिला आहे.
बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र सुरक्षित अंतर ठेवन्याकडे दुर्लक्ष होत आहे. बेळगाव सध्या रेड झोन’मध्ये आहे. त्यामुळे बेळगाव आता दक्षता घेण्यात येत आहे. अशा परिस्थितीत बेळगाव येथील फ्रुट मार्केट मध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी सुरक्षित अंतर न ठेवल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठी हल्ला केला आहे. माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बि आर गडेकर यांनी अनेकांना चांगली समज दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉक डाउनला सुरुवात झाली असताना नागरिकांना मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.