शहर आणि परिसरात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टीने आणि नको त्या कारणासाठी बाहेर पडणाऱ्यावर आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. माळ मारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात ड्रोन कॅमेरा द्वारे नजर ठेवण्याचे काम सुरू झाले आहे.
बेळगाव शहर पोलिस ठाण्याबाहेर दोषींना शोधण्यासाठी मद्यपान करणार्यावर यापुढे ड्रोनची नजर असणार आहे. त्यामुळे बाहेर पडताना आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलीस आणि प्रशासनाने हा निर्णय घेतला असून कारण नसताना बाहेर पडणाऱ्या वर ड्रोनची नजर असणार आहे.
माळ मारुती स्टेशनने पोलिस ड्रोन कॅमेरे उडवून गांधीनगर, उज्वल नगर आणि महंतेश नगर या शहरासह परिसरात ड्रोनवरून लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे. माळ मारुती चे पोलीस निरीक्षक बी आर गडेकर व त्यांचे सहकारी या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे.
ड्रोन कॅमेर्याच्या फुटेजच्या आधारे मारुती पोलिस, ग्रामस्थांचा पाठलाग करीत तंत्रज्ञान वापरुन लॉक डाऊन काळात कोणीही बाहेर पडल्यास त्यांच्यावर ही नजर असणार आहे. वारंवार सांगून देखील नागरिक फिरण्यात गुंग आहेत. त्यामुळे आता नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
ड्रोन कॅमेर्याच्या आधारे मारुती पोलिसांनी अनावश्यकपणे दुचाकी चालवणे बाहेर फिरणे यासह इतर हालचालींवर नजर ठेवून असणार आहेत. त्यामुळे वायफळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. गांधीनगर उज्वल नगर आणि कणबर्गी परिसरात ड्रोन कॅमेरा उडवून त्याची पाहणी करण्यात आली आहे. याच बरोबर इतर भागात या दोन द्वारे नजर ठेवण्यात येणार आहे अशी माहिती बी आर गड्डेकर यांनी दिली.
लॉक डाऊन करणाऱ्यावर ड्रोन कॅमेऱ्याची अशी आहे नजर-माळ मारुती पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी न्यु गांधीनगर उज्वल नगर आझाद नगर भागात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे तिसऱ्या डोळ्याची नजर ठेवायला केली आहे त्याची दृश्ये पहा फक्त बेळगाव Live वर
#malmarutigaddekarcpi
#thirdeyedronecamera
#lockdownbelgaumpolice
#belgaumlivenews
लॉक डाऊन करणाऱ्यावर ड्रोन कॅमेऱ्याची अशी आहे नजर-माळ मारुती पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी न्यु गांधीनगर उज्वल नगर…
Posted by Belgaum Live on Friday, April 10, 2020